महाराष्ट्रात भूमि अभिलेख विभाग जनमानसात खऱ्या अर्थाने ओळखला जातो तो सिटीसर्वे (City survey)या नावाने. खरं म्हणजे सिटीसर्वे (नगर भूमापन), ही भूमी अभिलेख विभागाची एक शाखा आहे.
:- नगर भूमापनाची प्रारंभिक माहिती :-
भूमी अभिलेख विभागाच्या महत्वाच्या नगर भूमापन शाखेकडून राज्यातील अनेक गावे , शहरांसाठी नगर भूमापण योजना तयार केली गेली आहे. नगर भूमापन विभागाने तयार केलेले घरांचे मिळकतीचे नकाशे व मिळकतीचे हक्काचे अभिलेख हे राज्याच्या विकासात खूप मोठी भूमिका बजवितात.
☀ कायदेशीर तरतुदी :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण आठ कलम 121 ते 131 च्या तरतुदीनुसार ज्या गावांची लोकसंख्या २००० अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्या गांवाचे/नगराचे /शहराचे नगर भूमापन केले जाते. कलम 126 नुसार नगर भूमापन मोजणी करणेत येते.कोणत्याही गांव/नगर /शहरांचे नगर भूमापन करणेपुर्वी प्रथमत:
☀ नगर भूमापनाचे उद्देश :-
नगर भूमापनाचे प्रशासकीय, राजकोषीय व कायदा हे तीन उद्देश आहेत.
☀ प्रशासकीय उद्देश:-
टपाल, पोलीस,विदयुत,स्वच्छता, जनगणना इत्यादी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी , शहरातील रस्ते, घरे,कार्यालये इत्यादी प्रदेश वर्णनात्मक तपशील दर्शविणारा अचूक नकाशा पुरविणे हा होय. पाणी पुरवठा ड्रेनेज, रेल्वे विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनांसाठी परिपुर्ण अथवा मोठया नकाशाची आवश्यकता असते. तर शैक्षणिक संस्था, वैदयकीय मदत, अग्नीशामक उपाय व जकात वसुली या सर्व गोष्टी शहरांच्या नकाशावर अचूक असतात.
☀राजकोषीय उद्देश:-
जमिनीपासुन येणे असलेल्या महसुलाची खात्री करणे आणि भविष्यातील महसुलाच्या विकासाकडे लक्ष देणे. तसेच सार्वजनिक जमीनीचे अतिक्रमणापासुन संरक्षण करणे आणि त्याची विक्री अथवा चोरुन विनियोग न घेणे हा आहे.
☀ कायदेशीर उद्देश:-
अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करणे व जे योग्य असतील त्यांना पाठिंबा देणे व त्यांचे उत्तम प्रकारे निर्धारिकरण करणे व जे अयोग्य आहे ते काढून टाकणे, मिळकत धारकामधील गुंतागुंतीचे दावे थांबविणे,खाजगी दावेदार व स्थानिक संस्था किंवा सरकार यांचेमधील हया बाबतचे शंकाचे निरसन करणे तसेच त्यांचेमधील होणारे वरीलप्रमाणे दावे थांबविणे हा होय.
- ट्राव्हसिंग. (दुर्बिण मोजणी काम)
- सविस्तर मोजणी.
- नगर भूमापन हक्क चौकशी काम.
- सनद व मिळकत पत्रिका तयार करणे.
- शुल्क आकारणी व वसुली.
- नगर भूमापन अभिलेख परिरक्षणास घेणे.
नगर भूमापन करावयाचे क्षेत्रातील प्रत्येक मिळकतीची मोजणी करणेत येते. मोजणी केलेल्या प्रत्येक मिळकतीचा हक्क ठरविण्याचे काम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20(2) मधील तरतुदीनुसार व तसेच गांव, नगर व शहर भूमापन नियम 1969 मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांचेकडून करणेत येते.
चौकशी अधिकारी यांनी चौकशी करुन हक्क कायम केलेनंतर त्यामिळकतीचे अधिकार अभिलेख तयार करणेत येतात.
नगर भूमापन अभिलेखाचे परिरक्षणांचे काम भूमि अभिलेख विभागातील परिरक्षण भूमापक / निमतानदार यांचेकडून करणेत येते. नगर भूमापन योजनेकामी झालेला खर्च सर्व मिळकत धारकांना त्यांचे मिळकतीची सनद देवून सनद फी च्या स्वरुपात वसुल करणेत येतो.
अपील :-
नगर भूमापन मिळकतीचे चौकशी काम चौकशी अधिकारी यांचेकडून पुर्ण झाल्यानंतर सदर चौकशी अधिकारी यांनी निर्णय देवून धारक घोषीत केलेल्या मिळकतीबाबत हितसंबंधीत व्यक्तीस जर हक्क निर्णय मान्य नसलेस त्या निर्णयावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अनुसुची- ई प्रमाणे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रासह प्रथम अपील दाखल करुन दाद मागता येते. तसेच जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे निर्णयावर व्दितीय अपील उपसंचालक भूमि अभिलेख यांचेकडे दाखल करुन दाद मागता येते.
नगर भूमापनाकडील अभिलेख :-
नगर भूमापन कार्यालयात खालीलप्रमाणे अभिलेख संधारण केले जातात.
1.नगर भूमापनाचे मुळ आलेख :-
आलेख1:500 प्रमाणात असतात. यावर नगर भूमापन मिळकतीची प्रमाणभूत आकृती नगर भूमापन क्रमांकासहित असते. मिळकती मधील बांधकाम व खुले क्षेत्र स्वंतत्ररित्या दर्शविलेले असते.
![]() |
नगर भूमापण city survey झालेल्या प्रत्येक गावातील नगर भूमापन हद्दीतील मिळकत धारकाला त्या मिळकतीचे धारकाचे नाव ,नकाशा , क्षेत्र नमूद केलेला एक शासकीय अभिलेख मिळतो. सनद म्हणजे संबधित मिळकत धारक व राज्य शासन यामधील करार असतो.