मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

ब्रिटिश काळातील भूमापनाचा ईतिहास -भूमी अभिलेख विभाग , काल, आज आणि उद्या. (भाग 2 )

                              ब्रिटिश काळातील भूमापनाचा ईतिहास     

Image result for Maj James Rennell

जेम्स रनेल - भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया ( बंगाल प्रांत )

ब्रिटीश राजवट:- 

आज अस्तित्वात असणाऱ्या भूमी अभिलेख विभागाची खऱ्या अर्थाने  मुळे रुजली ती ब्रिटिश काळात ,ब्रिटीशांनी सन 1600-1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविणेकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातुन ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली सदर पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणुन जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत '"Bengals Atlas" या पुस्तकात शंकु साखळीने जनिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.


कर्नल विल्यम लॅम्बटन - भारतीय भूमापनाच्या इतिहासातील मानबिंदु !
Image result for great trigonometrical survey of india lambton

भारतीय उपखंडाच्या भूमापनाचे खरे श्रेय जाते ते कर्नल विल्यम लॅम्बटन यांना,
 कलकत्ता स्थित ३३ व्या ब्रिटीश रेजिमेंटमध्ये ते सेन्य आधिकारेी म्हणुन दाखल झालेही रेजिमेंट सर ऑर्थर वेलस्ली यांच्यानेतृत्वाखाली कार्यरत होतीसन १७९६ मध्ये यांना लेफ्टनंट म्हणून  पदोन्नती मिळाली आणि ते कर्नल आर्थ यांच्या  नेतृत्वाखालील रेजिमेंटमध्ये सामिल झालेसन १७९९ मध्ये त्यांनीचौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धांत भाग   घेतलाश्रीरंगपट्टणमला युध्दामध्ये त्यांनी संपूर्ण ब्रिगेडचे नेतृत्व केले  त्यावेळी वरिष्ठ अधिकारी यांची   पिछेहाट होताच अत्यंतकुशलतेने लष्करातील डावी फळी सांभाळली.कर्नल लॅम्बटन यांच्या सर्वेक्षणातील   ज्ञानामुळे जनरल बेअर्ड यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूरयुध्दामध्ये निघालेल्या युध्द मोहिमेस ता*यांच्या मदतीने   योग्य दिशादर्शनकेले.
                         म्हैसूर काबिज केल्यानंतर वेलस्ली यांच्याकडे भूपृष्ठमिती(Geodesy) या नव्या तंत्राचा उपयोग करून सर्वेक्षण करण्याचा प्रस्तावत्यांनी मांडलायापूर्वी या सर्वेक्षण तंत्राचा वापर विल्यम रॉय यांनी ब्रिटनसर्वेक्षणावेळी केलात्यांनी मांडलेला प्रस्ताव मेजर जेम्स रॅनेल यांनी अशाप्रकारचे सर्वेक्षण कर्नल कॉलीन मॅकेन्झी यांनी हाती घेतलेने पुन्हा अशासर्वेक्षणाची आवश्यकता नाही असा शेरा नमूद करून प्रस्ताव नाकारलारॉबर्ट क्लाईव्ह यांचे नातेवाईक  प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ नेव्हीलमेस्केलीन यांनी कर्नल लॅम्टन यांच्या प्रस्तावाचे पुन:परीक्षण केले  त्याप्रस्तावाचे वैज्ञानिक मूल्य जाणून रॅनेल यांची दिशाभूल झाल्याचे मतव्यक्त केलेत्यामुळे या प्रस्तावास रॅनेल यांचा पाठींबा मिळण्यास मदतझाली आणि सदर सर्वेक्षण प्रस्तावास लॉर्ड क्लाईव्ह यांची मान्यता मिळाली.                                     लॅम्बटन यांनी ब्रिटनहून कोनमापकदूर्बिण (थिओडोलाईटमागवली  तीभारतात येण्यासाठी सन १८०१ साल उजाडले. या उपकरणाच्या सहाय्याने लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. 
                     
Related image
 लॅम्बटन यांनी ब्रिटनहुन मागवलेली थिओडोलाईट 

त्या वेळेचेथिओडोलाईट  उपकरण म्हणजे वस्तुतउभ्या  आडव्या समांतर वर्तुळाकार चकत्यांवरफिरणारी दुर्बिण होय.त्यावेळी संपूर्ण जगामध्ये अशापध्दतीची फक्ता दोन/तीनच उपकरणे उपलब्ध होती. विल्यम रॉययांनी केलेल्या ब्रिटिश सर्वेक्षणावेळी असे उपकरण प्रथमच उपयोगातआणलेया उपकरणाचे उत्पादन विल्यम कॅरी यांनी केले होतेयाउपकरणात क्षितिजसमांतर ३६ इंच तर उभ्या १८ इंच व्यासाचीचकत्यांवरील मापे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने घेतली जात होतीया यंत्राचे वजन सर्वसाधारणपणे ५०० किलो होते, त्यास उचलण्यासाठी १२हून अधिक लोकांची आवश्यक पडत असेया उपकरणाच्या सहाय्याने लॅम्बटन यांनी मद्रास  बंगळूर आधाररेषेची तुलनात्मक गणना केली असता केवळ अडीच इंचाचा फरक आढळून आलायावरून या उपकरणाची अचूकता  दर्जा अधोरेखित होतो.

Related image
 ⇦  लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. 





Image result for great trigonometrical survey of india lambton




भूमापन कामाकरिता reference पॉईंट  तयार करतांना ( एक कल्पनाचित्र)                

Image result for great trigonometrical survey of india lambton
लॅम्टन यांची हिंगणघाट येथील समाधी 







महाराष्ट्रातील कृष्णा-गोदावरी खोऱ्यांच्या मोजणी वेळी लॅम्टन यांना मलेरिया सदृश्य तापाची बाधा झाली पुढील तीन वर्षे हा आजार वाढत गेला. 20 जानेवारी 1823 मध्ये  वयाच्या 70 व्या वर्षी वर्ध्या जवळील हिंगणघाट येथे त्यांचा मृत्यू झाला. 


                                                                                                                                   कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षण इतिहासातीलसाहसीमहत्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या किचकट सर्वेक्षणाचीसुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून केलीसर्वेक्षणाचे कामपूर्ण होण्यासाठी चार दशकांचा प्रदीर्घ कालावधी लागला  हा सर्वेक्षणप्रकल्प हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण झालाकर्नल लॅम्बटन यांनी अत्यंतकाळजीपूर्वक सेंट थॉमस पर्वतापासून दक्षिणेस १२ कि.मीअंतरावरभारतीय द्विपकल्पाच्या मध्यावर अक्षांश  रेखांश नोंदविण्यासाठीआधाररेषा निश्चित केलीसाधारणपणे ७८० रेखांशाच्या व्यामोत्तर(दक्षिणोत्तरभारतीय उपखंडातील २४०० कि.मीअंतराचा परिसर "ग्रेटइंडियन आर्क ऑफ  मेरिडीयनम्हणून ओळखला जातो या मोहिमेचे फलस्वरूप सन १८४३ मध्येहिमालय पर्वतरांग ही ण्डिज पर्वतापेक्षाही उंच असल्याचे सिध्द झाले जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट या शिखरास मान्यतामिळाली.  
                                    

   ➤ सर जॉर्ज एव्हरेस्ट -

.Image result for great trigonometrical survey of india lambton      कर्नल लॅम्टन यांच्या मृत्यूनंतर भुमापणाची ही जबादारी जॉर्ज एव्हरेस्ट यांच्यावर आली. भूमापनाचे काम चालू असताना 1806 मध्ये यांचे एक सैनिक म्हणून भारतात आगमन झाले व त्यांनी भूमापनाच्या या कामात मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली.  यांना 'सर्व्हेअर जनरल बहादूर ' असे संबोधले जाऊ लागले. कर्नल लॅम्टन यांनी सुरू केलेल्या कामाला अखेर 40 वर्षानंतर यांनी मूर्त रूप दिले.
                                      जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याच नावावरून जगातील सर्वोच्च उंचीच्या पर्वताला”एव्हरेस्ट पर्वत’ हे नाव देण्यात आले





  

                    Index map of Great Trignometric Survey of India


सर्वेक्षणाच्या या महान  जोखीमपूर्ण मोहिमेत समकालीन युध्दांमध्ये बळी गेलेल्या लोकांप्रमाणेच या मोहिमेमध्येही बळी गेलेत्या कालखंडामध्ये संगणकउपलब्ध नसताही अत्यंत जटिल गणितीय समीकरणांचा वापर करूनसर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.आधुनिक संचार सुविधासंपर्क यंत्रणा  सर्वेक्षण साधने उपलब्धनसताना देखील मोहिम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यासाठी कर्नल लॅम्टन यांनी कठोर परीश्रम घेतले  भारतीय उपखंडातील शास्त्रोक्त सर्वेक्षणाचीमुहूर्तमेढ रोवलीआपल्या देशातील वैविध्यपूर्ण हवामानडोंगररांगा,पर्वतरांगा,गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्यादलदलीचा प्रदेशपूरसंसर्गजन्य आजार यावर मात करून GTS  मोहिम कर्नल लॅम्टन आणि जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्णझाली, आणि भारतीय उपखं-डाचा नकाशा अस्तित्वात आला
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय भूमापनाचा हा इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मी या ब्लॉग मध्ये मांडला आहे , खरं  तर ती एक खूप मोठी कहाणी आहे , पण ब्लॉगच्या  वाचकांच्या माहिती साठी अतिशय कमी शब्दात काही छायाचित्रांच्या साहाय्याने मी तो मांडण्याचा प्रयत्न केलाय.

⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
 ➤ पुढील ब्लॉग मध्ये -
ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात कशी झाली जमीन मोजणीला सुरवात ? कसा अस्तित्वात आला आजचा ' महाराष्ट्र राज्याचा भूमी अभिलेख विभाग ' ?